‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली

मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या संजय वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्येही वेगळीच कुजबूज असल्याची चर्चा आहे.

अशातच, शिवसेना नेते आणि खासदार संजय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून टीकेचे बाण चालवले आहेत. रोखठोकच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री पदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?”, असे म्हणत राऊत यांनी गृहमंत्रीपदाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

वाचा काय आहे आजच्या ‘रोखठोक’मध्ये…
मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटकं प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. सिंह हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी.

पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले.

पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा सवाल रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

…अन् नेटकऱ्यांनी सारा इतिहास मोदीमय केला, पाहा व्हायरल झालेले भन्नाट मिम्स; LieLikeModi, #BalNarendra

आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं भावनिक पतीला पत्र; वाचून डोळ्यांत पाणी येईल

“मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.