…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान

मुंबई | ‘देशातील राजधानीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते. दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘दिल्लीत जे झाले आहे त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही. सरकारला हवे असते तर आजचा हिंसाचार रोखता आला असता. दिल्लीत जे चालले आहे त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडले?’

तसेच पुढे राऊत म्हणाले, “दिल्लीत जे आज झालं त्याला मी राष्ट्रीय स्तरावरील लाजिरवाणी गोष्ट मानतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण जग देशाचं सामर्थ पाहत असताना दुपारनंतर संपूर्ण जगाने दिल्लीच्या रस्त्यांवर जे दृश्य पाहिलं. हे आंदोलकांना शोभा देत नाही किंवा सरकारलाही शोभत नाही.”

दरम्यान, ‘सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का?  सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. काही औरच चालले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला
दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन
आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.