संजय राऊत (Sanjay Raut): शिंदे सरकार स्थापन होऊन एवढे दिवस लोटल्यानंतरही ठाकरे-शिंदे वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. दोन्ही गटातील आमदार एकामागून एक सतत एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापादेखील पडला आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर आपले नवीन टीकास्त्र सोडले आहे.(Sanjay Raut, Shiv Sena, Sanjay Shirsat, Shinde group, Maharashtra politics)
संजय राऊत यांच्यावर सुरु असलेली कारवाई मागील ४ ते ५ महिन्यांपासून सुरु आहे. ईडीने त्यांना अनेकदा नोटीस पाठवली होती, परंतु काही वेळा ते त्याला हजर नव्हते. संजय राऊत यांच्या घरी सापडलेले पैसे हे शिंदेनी दिले असल्याचे समजावे. अयोध्येला जाऊन किती महिने झाले? तुम्ही हे पैसे पक्षाला परत करायला हवे होते. याचा अर्थ राऊतांना ते पैसे स्वतःकडे ठेवायचे होते, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
काल ईडीच्या कारवाईच्या वेळी संजय राऊत यांनी केलेले हातवारे हे अतिशय चुकीचे असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरदेखील ईडीची कारवाई झाली होती, परंतु ते अशा पद्धतीने वागले नाहीत, असे शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली आहे. त्यामुळे ४० आमदार आणि १२ खासदार शिवसेनेतून बाहेर पडले, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
‘संजय राऊतांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही पक्षासाठी ४० वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. तुम्ही शिवसेना फोडली त्यामुळे आता तुम्हाला त्या पापाची फळे भोगावी लागत आहेत, असेदेखील शिरसाट म्हणाले. तुम्ही फक्त सामनात छापू शकता परंतु जनतेच्या मनावर छापू शकत नाही. तसेच संजय राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी, असेही शिरसाट म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नादाला लागून राऊतांनी शिवसेनेचं वाटोळं केलं, असा आरोप संजय शिरसाट यांनी राऊतांवर केला. ईडीची कारवाई कायद्यानुसार होत असते. तसेच जर राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल, असेदेखील संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत आणि प्रवक्त्या देखील नाही, त्यामुळे संजय राऊतांनी दीपाली सय्यदांना झापलं
ब्रेकींग न्युज! शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई
राऊतांमुळे ठाण्यात एकच नगरसेवक राहिला, सौ दाऊद, एक राऊत; मनसेची खोचक टीका