मुंबई | गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात,’ असे राऊत म्हणाले.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे.’
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इंग्रजांच्या काळातील ९९ वर्षे करारावर देण्यात आलेल्या मुंबईतील जमिनी ९९९ वर्षे करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा ९९९ वर्षे केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबीय यांच्यातील जमीन व्यवहाराबद्दल सोमय्या यांनी आरोप केले आहे. ठाकरे कुटुंबाने आतापर्यंत जमिनीचे ४० व्यवहार केले असून त्यापैकी ३० व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला
‘राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका’
राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेची रणरागिणी कडाडली, म्हणाली…