३१ वर्षाच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिलंय; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया 

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला आहे.

याच पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्यानं देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत असल्याचे राऊत यांनी म्हंटलं आहे.

तसेच ‘मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
महागठबंधनची मुसंडी, बहुमताचा आकडा गाठला, १२६ जागांवर आघाडी
राज्यपालांनी फोन केला अर्णबला नातेवाईकांना भेटूद्या; गृहमंत्र्यांनी थेट सुनावले नाही जमणार
या लढाईत मराठी माणसांनी आमच्या मागे उभं राहावं; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.