Share

Sanjay Raut : नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका’; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीपासून *हिंदी भाषेची सक्ती* करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गुरुवारी शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या प्रचाराची गरज असताना, राज्य सरकार हिंदी भाषेला पुढे का नेत आहे?* असा सवाल करत विविध संघटना, शिक्षणतज्ज्ञांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तर मनसेनेही आक्रमक भूमिका घेत *’भाषायुद्ध’* छेडण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर *ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनीही या निर्णयावर टीका करत भाजप आणि मनसे दोघांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “*मराठी भाषेविषयी भाजप नेहमी मौन का बाळगते?* महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांचा सहभाग नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते नव्हते, बेळगावच्या सीमावादावरही त्यांनी आवाज उठवलेला नाही. आणि आता हिंदीला सक्ती करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे?”

राऊत पुढे म्हणाले, “*हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तरीही ती लादली जात आहे.* पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान मर्यादित असल्याने, हिंदीची सक्ती ही त्यांच्या सोयीसाठी आहे. पण इतर भाषांवर सूड उगवण्यासाठी असा निर्णय योग्य नाही.”

*मुंबईत हिंदीची समृद्ध परंपरा असतानाही* अभ्यासक्रमामध्ये सक्ती करणे योग्य नाही, असं सांगत राऊत(Sanjay Raut म्हणाले, “*हिंदी भाषा भवन, हिंदी नाटक, साहित्य याच महाराष्ट्रात आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की राज्यातील विद्यार्थ्यांवर हिंदी लादावी.* उलट राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी, नोकरी-धंद्यातही मराठीचे महत्त्व वाढवावे.”

शेवटी, राऊतांनी यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत सांगितले की, “*हिंदी भाषा सक्तीचा निर्णय ही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेली रणनीती आहे.* ही राजकीय स्टंटबाजी थांबवावी, अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

या निर्णयामुळे राज्यातील भाषाविषयक भावना चांगल्याच उफाळून आल्या असून, आगामी काळात यावरून मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
sanjay-raut-attacks-narendra-modi-and-amit-shah

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now