‘मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात, कॉंग्रेसने देखील स्वीकारायला हवं’

मुंबई | ठाकरे सरकारमधील कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर आल्या आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्याने महाआघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती.

याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसला सल्ला दिला आहे. ‘आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अंहकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी कुठेही मेहनतीत कमी पडत नाहीत. त्यांना नशीब आणि भाग्य साथ देत नाही,” असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, ‘मला असं वाटतं की, शरद पवारांची जी भूमिका आहे, शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसकडून आघाडीतील नेत्यांना इशारा…

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

“आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

वाचा काय म्हणाले होते शरद पवार…

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं? असं विचारलं असता अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असे शरद पवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या
विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करताना संजय राऊतांची भाजपवर टीका, म्हणाले…
“अजित दादा कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का”
‘एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.