मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे समजते आहे.
काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचे देखील ते म्हणाले.
यानंतर आता शरद पवार यांच्या नाराजीबाबत राठोड यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला याबाबत काही बोलायचे नाही. मी जे काही बोलायचं आहे ते काल बोललो आहे. काल सांगितल्या प्रमाणे आजपासून मी माझ्या शासकीय कामांना सुरुवात करणार आहे. आता मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत जात आहे.’
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश…
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. पोहरादेवी परिसरात केवळ ५० जणांना जमण्याची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
संजय राठोडांवर शरद पवार प्रचंड नाराज; राजीनामा द्यावा लागणार?
पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट
अंधश्रद्धेचा कळस! सापाने दंश केल्यानंतर मुलीला नेले बाबाकडे; उपचाराअभावी सोडले प्राण