पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांनी मौन सोडले; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

यवतमाळ | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय रोठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तब्बल १५ दिवसांनतर मौन सोडले आहे. काही दिवसांपुर्वी पुण्यात पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी मंत्री संजय रोठोड यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते.

संजय राठोड यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, पुजा चव्हाण या आमच्या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूने संपुर्ण समाजाला दुख: झाले आहे. याचे आम्हालाही दु:ख आहे आम्ही त्यांच्या चव्हाण कुटुंबीयांच्या  सोबत आहोत.

पुजाच्या मृत्यूवरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे. याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाच नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप लावून माझं सामाजिक आणि राजकीय जीवन संपवण्यासाठी षडयंत्र केले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण
मंत्री संजय राठोडांना पत्नीची खंबीर साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.