मंत्री संजय राठोडांना पत्नीची खंबीर साथ

यवतमाळ | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात सापडलेले शिवसेना मंत्री संजय राठोड आज पोहरादेवीला रवाना होत आहेत. खाजगी गाडीतून पत्नी शीतल राठोड यांच्या सोबत संजय राठोड निघाले आहेत.

संजय राठोड हे काल यवतमाळमध्ये दाखल झाले होते. शिवसेनेच्या यवतमाळमधील नेत्यांसोबत चर्चा करून खाजगी वाहनाने पोहरादेवीकडे जायला निघाले आहेत.

संजय राठोड यांचे निवस्थान आणि पोहरादेवी अंतर ८० किलोमीटर आहे. त्यांच्या सोबत अनेक गाड्यांचा ताफा आहे. पत्नी आणि काही जवळच्या नातेवाईकांसोबत संजय राठोड पोहरादेवीत जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहेत.

दरम्यान संजय राठोड दर्शन घेऊन आणि होमहवन करून माघारी जाणार आहेत. ते कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन करणार नसल्याचं महंत जितंद्र महाराज यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मोदीजी आम्हाला रोजगार द्या”; लाखो बेरोजगारांचा आक्रोश; सोशल मिडीयात ट्रेंड टॉपवर
लॉकडाउनचा अनुभव सांगताना अजित पवारांनी केले कळकळीचे आवाहन; ‘कृपा करा…’
जाणून घ्या रेखा आणि बिजनेस मॅन मुकेश अग्रवालच्या लग्नाचे सत्य
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.