लॉकडाऊनची काही आवश्यक्ता नाही लॉकडाऊनच्या धमक्या देणं बंद करा; कॉंग्रेस नेत्याने सुनावले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. धुळवड आणि त्यानंतर एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाउन आणि सरकारी निर्बंधांविरोधात निदर्शनं केली. या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस नेते संजय निरूपम हे देखील तिथे उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘मागील लॉकडाउनमुळे लोकं एवढी उद्धवस्त झालेली आहेत की, आजपर्यंत स्थिरावली नाहीत. आता करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही,’ असे निरूपम यांनी म्हंटले.

‘सरकारने आमचं म्हणणं ऐकावं सर्वसामान्य नागरिक, उद्योजकांच्या अडचणी त्यांनी ऐकाव्यात आणि जेवढं लवकर होईल तेवढं लॉकडाउनची धमकी देण्याऐवजी नव्या मार्गदर्शक सूचनांबरोबर सर्वांना सोबत आयुष्य जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी निरूपम यांनी केली.

दरम्यान, गेल्यावेळी जो लॉकडाउन झाला तर मोठ्याप्रमाणात मुंबईहून स्थलांतरित मजुरांना मिळेल त्या मार्गाने जावं लागलं. आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांना बेराजगार होऊन गावी जावं लागू शकतं. ही परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरणार नाही,’ असेही त्यांनी म्हंटले.

महत्त्वाच्या बातम्या 

बाॅलीवूड पुन्हा हादरले! भाजपची खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ब्लड कॅन्सर

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद करा; काॅंग्रेस नेत्याचा निशाणा

“करण जोहर आणि आदित्य चोप्रा लपून बसले आहे, आता मीच आहे बॉलिवूडची तारणहार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.