मुंबई | पुण्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपने हातातली आणखी एक जागा गमावली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता पराभवानंतर भाजपमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत बोलताना पुढे काकडे म्हणाले, या निवडणुकीच्या प्रचारात योग्य नियोजन नव्हते. नगरसेवक, इतर पदाधिकारी यांना त्यात सहभागी करून घेतले नाही. निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी केली, यातच नेतृत्त्व खूष होते. पण हे मतदान आपल्याला कसे करून घेता येईल, हे पाहिले गेले नाही. तसेच वेगळ्याच मुद्यांना महत्त्व दिल्याने मतदारांवर त्याचा योग्य परिणाम झाला नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पक्षाने या निवडणुकीत झालेल्या चुका तातडीने दुरूस्त कराव्यात अन्यथा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसेल, असा सूचक इशारा संजय काकडे यांनी पक्षाला दिला आहे.
..तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा
शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य पुरुषोत्तम बरडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
नेहा कक्करच्या सुखी संसाराची सुरुवात होतास एक्स बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा…
आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..