“माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे”

भाजप नेते हर्षवर्धन यांच्या वक्तव्याने काही दिवसांपूर्वीच एकच खळबळ उडाली होती. भाजपमध्ये गेल्यावर निवांत झोप लागते, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. आता असेच एक स्फोटक वक्तव्य भाजपच्या खासदाराने केले आहे.

सध्या राज्यभरात अनेक नेत्यांची सक्तवसुली संचालनालयाची म्हणजेच ईडीची छापेमारी सुरु आहे. याचाच संदर्भ घेत भाजप खासदार संजय काका पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. माझे मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

संजय काका पाटील हे विटा येथील एका कार्यक्रमात उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच संजय काका पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एक नवीन वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पाहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत की काय? असे संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरुन केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी ही वक्तव्य केली आहे.

मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो. केंद्रीय यंत्रणा निवडकपणे कारवाई करतात. चौकशी सुरु असलेला नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते असे म्हटले जाते. पण संजय काका पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकप्रकारे त्यांना पुष्टीच मिळाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी हर्षवर्धन पाटील यांनीही एक वक्तव्य केले होते. यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आले? या प्रश्नाचे उत्तर देत होते. स्टेज गंमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का आलात? मी म्हटलं आमच्या नेत्यांना विचारा. सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, मस्त झोप लागते, चौकशी नाही काही नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे! १७ वर्षाच्या मुलाला मोबईलचं वेड, २ लाखात बायकोला विकून घेतला महागडा मोबाईल
गोसावीच्या बॉडीगार्डचे खळबळजनक दावे; शाहरूखकडे मागितले १८ कोटी, त्यातले ८ कोटी वानखेडेंना
हार्दिक पांड्याला आठवले ते दिवस जेव्हा त्याचा वाईट काळ असताना धोनीनेच दिली होती साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.