Share

‘मेरे कार्यकर्ता आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता, भानगड की तो…’ शिंदे गटाचा ठाकरें इशारा

Eknath Shinde Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेल बुलढाण्यातील बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  नेहमीच आपल्या रोखठोक व्यक्तव्याने चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याने राजकीय वर्तुळात सध्या संजय गायकवाड यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.

अलीकडेच शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. हा संपूर्ण प्रकार बुलढाण्यातील आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी थेट आतमध्ये घुसत हल्ला करून तोडफोड केली.

अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही  पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले. या घटणेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी भाषेतून प्रतिक्रिया दिली आहे.

गायकवाड यांनी म्हंटलं आहे की, ‘बुलढाणा जिले मे शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे है. आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोक लिया. उनको पता नही है की संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है… ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है.. .’

पुढे बोलताना गायकवाड यांनी म्हंटलं आहे की, ‘ये अगर खवळ जाते तो किस्के बाप को बाप समजते नही. अगर इसके बाद इन्होने कुछ भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे. गिन गिन के मारे जायेंगे. वो तो सौभाग्य है की पुलिस बीच मे थी…’, सध्या गायकवाड यांच्या हिंदी भाषेची राज्यात चर्चा सुरू आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय?

हा संपूर्ण प्रकार बुलढाण्यातील आहे. शनिवारी (काल) दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी थेट आतमध्ये घुसत हल्ला करून तोडफोड केली. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही  पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले. या कार्यक्रमास शिवसनेचे उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सुरू होत असतानाच शिवसेनच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश करत थेट सभागृह गाठून तेथे उपस्थित उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Shilpa Shetty: पाय दुखत असतानाही गणपतीसमोर नाचली शिल्पा शेट्टी; चाहत्यांनी ठोकला सला
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now