Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणातील टीकांचे सत्र अजूनही सुरूच आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप काही केल्या थांबताना दिसत नाहीत. यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हा गेम केला असल्याचे ते म्हणाले आहेत. बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी संजय गायकवाड त्यांच्या भाषणात बोलत होते.
यावेळी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, हे षडयंत्र १९९७ पासून चालू आहे. उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. संबंध होता तो फक्त राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा. त्यावेळी बाळासाहेबांची बायपास झाली. त्यांची पत्नी त्यांचा मोठा मुलगा वारला. त्यानंतर बाळासाहेब एकाकी पडले.
त्यातच आतंकवाद्यांच्या धमक्यांमुळे त्यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली गेली. त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी बंद झाल्या. हे सगळं पाहून तेव्हा उद्धव ठाकरेंना वाटलं की, आता आपण राज्याचे मुख्य झालो पाहिजे. त्यावेळी सर्वात आधी शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता असे, निवडणूक आयोगाने सांगितले.
तेव्हा सगळ्यात मोठी अडचण राज ठाकरे ही होती. मग सगळं प्लॅनिंग झालं. मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कानात असं सांगितलं की, तुम्ही उद्धव ठाकरेंचे नाव सुचवा, अशी बाळासाहेबांची ईच्छा आहे. त्यानंतर राज ठाकरे बाळासाहेबांना क्रॉस करू शकत नव्हते.
तेव्हा राज ठाकरेंनी काहीही संबंध नसताना उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा असे सुचवले. तिथे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पहिला गेम केला, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
Kishori Pednekar : शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, किशोरी पेडणेकर नाराज? थेट उद्धव ठाकरेंकडे केली तक्रार
Shinde Group : राऊतांच्या कारभाराला कंटाळून ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार? पहा नेमकं काय घडलय
Nagpur : फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरात भाजपला दणका; काॅंग्रेस राष्ट्रवादीने केला सुपडा साफ
Eknath shinde: राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्या मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण w