Sanjay Dutt : चित्रपट मराठी असो वा हिंदी, काही मराठी कलाकार असे आहेत, ज्यांनी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करुन चांगलं नाव कमावलं आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे संजय नार्वेकर. संजय नार्वेकरने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याचा सर्वात जास्त लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे वास्तव. वास्तवमध्ये त्याने संजय दत्तसोबत काम केले आहे.
वास्तवमध्ये संजय नार्वेकरने संजय दत्तच्या साईडकिक देड फुटियाचं काम केलं होतं. हे काम करताना त्याच्यासोबत अनेक किस्से घडले होते. आता त्या किस्स्याचा खुलासा संजय नार्वेकरने किचन कल्लाकारच्या सेटवर केला आहे. किचन कल्लाकारच्या सेटवर संजय नार्वेकरने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने वास्तवचा अनुभव सांगितला आहे.
संजय नार्वेकर सेटवर आले असताना तो त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगत होता. असे असतानाच या शोची होस्ट श्रेया बुगडेने वास्तवचा तो किस्सा सांगण्याची विनंती संजयला केली. संजय दत्तने तुमच्यासाठी सेटवर खुर्ची मागवली होती तो किस्सा नेमका काय होता? असा प्रश्न श्रेयाने विचारला होता.
श्रेयाच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय नार्वेकर म्हणाला, वास्तव सिनेमातील देड फुटिया ही भूमिका मी करावी अशी महेश सरांची इच्छा होती. मला आठवत मी रुईया नाक्यावर होतो. तेव्हा मोबाईल नव्हता. पेजर होता. मांजरेकरांनी मला मडच्या बंगाल्यावर बोलावलं होतं. त्यावेळी तासाभरात मी बाईकने तिथे गेलो होतो. मग कपडे वगैरे घातले आणि तो सीन केला.
त्यावेळी पहिला शॉट झाला की चेक करायला लॅबमध्ये जावं लागायचं. कारण ते फुटेज लॅबमध्ये जायचं, ते डेव्हलप व्हायचं आणि ते चेक करायचे. ते चेक करण्यासाठी महेश मांजरेकर, संजय दत्त प्रोड्युसर हे सर्वजण गेले होते. दुसऱ्या दिवशी त्याच बंगल्यात शुट होतं.
त्यामुळे मी चहा पीत बसलो होतो. तिथे संजय दत्त येणार होता. चहा घेत मी पायऱ्यांवर बसलो होतो. तितक्यात संजय दत्त आला नेहमीप्रमाणे त्याने सर्वांना हात केला. मग त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो माझ्याकडं आला आणि त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली.
तो म्हणाला, क्या काम किया है, बहोत अच्छा काम किया है, व्हेरी नाईस. मैं महेश को भी बोला अच्छा है. त्यानंतर त्याने मॅनेजरला बोलावलं. संजय दत्तने त्याला सांगितलं की, इसके आगे ये अगर नीचे बैठा हुआ दिखा तो क्या करुँगा मालूम हैं ना? इसको खुर्सी मिलने मांगता. चाय मिलना मांगता. ये कभी नीचे बैठा नहीं मांगता. असा हा किस्सा संजय नार्वेकरने किचन कल्लाकार शोमध्ये सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या
७७ वर्षांच्या आज्जीबाईंचा नाद खुळा! चक्क स्विमींग स्पर्धेत मिळवलं गोल्डमेडल, वाचून कौतूक कराल
pune : व्वा रे पठ्ठ्या ! पुण्यामधील बाप-लेकाचा खेकडा शेतीचा भन्नाट प्रयोग यशस्वी, कमावतात लाखो रूपये
Subodh Bhave : मराठी माणसासाठी अभिमानास्पद गोष्ट; पहा सुपरस्टार नागार्जून शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाला…