संजय दत्तच्या पहील्या पत्नीने मृत्यूपूर्वी लिहीलेले ‘हे’ पत्र वाचून सर्वांना बसला धक्का; मुलगी त्रिशला झाली भावूक

संजय दत्तच्या जिवनावर अधारित संजू चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या जिवनातील प्रत्येक घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. पण त्याच्या पहील्या पत्नीबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. त्याची पहीली पत्नी आणि मुलगी त्रिशलाबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे.

संजय दत्तने तीन लग्न केले होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर संजय दत्तचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले होते. संजयने १९८३ ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट यशस्वी झाला आणि संजय दत्त बॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा बनला.

संजय दत्तला इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख मिळाली होती. त्यासोबतच संजय त्याच्या प्रेम प्रकरणांमूळे देखील खुप जास्त चर्चेत आला होता. अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले होते. पण १९८६ मध्ये संजयने रिचा शर्माशी लग्न केले. संजयचे हे पहीले लग्न होते.

लग्नाच्या काही दिवसानंतर संजय आणि रिचाला त्रिशला ही मुलगी झाली. दोघेही त्यांच्या संसारात सुखी होते. संजयला ड्रग्जची सवय होती. या सवयीतून बाहेर येण्यासाठी त्याची पत्नी त्याला मदत करत होती. त्यामूळे रिचा संजयच्या आयूष्यात खुप महत्वाची होती. त्याचे रिचावर खुप जास्त प्रेम होते.

पण रिचाला ट्यूमर आजाराने ग्रासले. याच आजारामूळे १९९६ मध्ये रिचाचा मृत्यू झाला. रिचाच्या मृत्यूनंतर संजय दत्तला खुप मोठा धक्का बसला होता. त्याच्या आयूष्यातील महत्वाची व्यक्ति त्याला सोडून गेली होती. यामूळे संजयची मुलगी त्रिशलाला देखील धक्का बसला होता.

काही दिवस संजय दत्तसोबत राहिल्यानंतर त्रिशला शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. ती संजयला भेटण्यासाठी नेहमी मुंबईत येत असते. मान्यतासोबतही त्रिशलाचे खुप चांगले संबंध आहेत. पण तिला नेहमीची तिची आई रिचाची आठवण येत असते.

काही दिवसांपूर्वीचे त्रिशलाने तिच्या आईच्या आठवणींमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने रिचाने मृत्यूपूर्वी लिहीलेले पत्र पोस्ट केले होते. हे पत्र वाचून त्रिशलाच्या डोळ्यात पाणी आले होते. मृत्यूपुर्वी रिचाने हे शेवटचे पत्र लिहीले होते. संजयने हे पत्र अनेक वर्ष जपून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी त्याने हे पत्र मुलगी त्रिशलाले दिले. आत्ता हे पत्र त्रिशलाकडे आहे.

या पत्रामध्ये रिचाने लिहीले आहे की, ‘आम्ही सर्व एकत्र जाऊ. सर्वजण आपला मार्ग निवडतो. मी सुद्धा माझा मार्ग निवडला होता. पण माझा मार्ग मध्यभागीच मरण पावला. मी परत कसे जाऊ मला आणखी एक संधी मिळेल का? मला माहीती आहे की, पुढे कोणताही मार्ग नाही. पण तरीही मी वाट पाहत आहे. मला अजूनही अशा आहे की मी माझ्या स्वप्ननांकडे पोहोचेण आणि ते माझे स्वागत करतील’.

त्रिशलाने तिच्या इंस्ट्राग्राम आकाउंटवर हे पत्र पोस्ट केले आहे. ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्रिशला आणि संजयची तिसरी पत्नी मान्यतामध्ये फक्त आठ वर्षांचे अंतर आहे. मान्यता दत्त ४० वर्षांची आहे तर त्रिशला दत्त ३२ वर्षांची आहे.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे

‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…

तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.