मान्यता दत्त अभिनेता संजय दत्तची पत्नी आहे. मान्यताने देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मान्यता दत्तचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. पण ती लहानाची मोठी दुबईमध्ये झाली. मान्यताला अभिनेत्री व्हायचे होते.
मान्यता दत्तचे खरे नाव दिलनवाज शेख असे होते. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने ते नाव बदलले होते.
मान्यता दत्तला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी ती मुंबईत आली. पण तिला सुरुवातील त्यासाठी खुप जास्त स्ट्रगल करावे लागले होते.
मान्यताला मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळत नव्हते. त्यामूळे तिने बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले.
मान्यताने गंगाजल चित्रपटामध्ये एक ऍटम सोंग केले होते. पण तिला बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळत नव्हती.
या कालावधीमध्ये मान्यता आणि संजय दत्त या दोघांची भेट झाली. ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मान्यता संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसची सीईओ होती.
मान्यता दत्तने ‘लव्हर्स लाईक अस’ या सी ग्रेड चित्रपटामध्ये काम केले होते. हि गोष्ट संजय दत्तला माहिती होती. त्याला हि गोष्ट आवडत नव्हती.
त्या चित्रपटाच्या सीडी आणि डिव्हीडी मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. त्यामूळे संजय दत्तने त्याची पुर्ण ताकद वापरुन मार्केटमधून त्या सीडीज रातोरात गायब केल्या.
संजय दत्त आणि मान्यता दत्तने २००८ साली लग्न केले. एवढ्या वर्षांनंतर देखील ते दोघे सुखाचा संसार करत आहेत.