रागारागात धरम पाजीला मारायला सेटवर गेला होता संजय दत्त; पण धर्मेंद्रने मात्र…

संजय दत्तला बॉलीवूडचा सर्वात मोठा रोमान्सचा बादशहा म्हंटल तरीही काही चुकीचं नाही. कारण त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्तचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट व्हायचे.

संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. सुनील दत्त आणि नर्गिसचा मुलगा असल्यामुळे संजयला बॉलीवूडमध्ये खुप लवकर काम मिळाले होते. पण करिअरच्या सुरुवातीला संजय दत्त त्याच्या चित्रपटांमूळे नाही तर त्याच्या अफेअर्समूळे जास्त चर्चेत असायचा.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये संजय दत्तचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्याच्या अफेअरमूळे तो खुप जास्त चर्चेत असायचा. संजय दत्त त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन खुप पझेसिव्ह होता. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्यासोबत काम केलेले त्याला आवडत नव्हते.

पण त्याच्या एका गर्लफ्रेंडने एकदा त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला होता. म्हणून संजय दत्त त्या चित्रपटातील अभिनेत्याला मारायला चित्रपटाच्या सेटवर गेला होता. या गोष्टीची त्यावेळी खुप जास्त चर्चा झाली होती.

संजय दत्त ८० च्या दशकात मॉडेल आणि अभिनेत्री किमी काटकरला डेट करत होता. त्याच्या या अफेअरबद्दल फिल्म इंडस्ट्रीतील सर्व लोकांना माहीती होते. किमी देखील संजयवर खुप जजास्त प्रेम करत होती. त्यासोबतच ती बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत करत होती.

याच कालावधीमध्ये किमी काटकरने धर्मेंद्रसोबत ‘हामला’ चित्रपट साइन केला होता. हा चित्रपट मल्टि स्टारर होता. किमी आणि धर्मेंद्रसोबतच अनेक अभिनेते या चित्रपटामध्ये काम करत होते. या चित्रपटाची खुप जास्त चर्चा सुरू होती.

चित्रपटाची चर्चा अजून व्हावी म्हणून निर्माते खुप प्रयत्न करत होते. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी किमी काटकर आणि धर्मेंद्र या दोघांमध्ये किसिंग सीन शुट केला होता. फक्त प्रोमोशसाठी या सीनचा वापर करण्यात येणार होता.

या किसिंग सीनबद्दल ज्यावेळी संजय दत्तला समजले. त्यावेळी तो खुप जास्त भडकला. त्याने किमिला फोन केला आणि या सीनबद्दल विचारले. किमीने संजयला सांगितले की, हा सीन फक्त प्रोमोशनसाठी शुट करण्यात आला आहे.

संजय दत्त किमीवर खुप चिडला होता. त्याने फोनवरच तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. किमीला हे आवडल नाही. म्हणून तिने फोन ठेवून दिला. त्यानंतर संजयने चित्रपटाच्या निर्मात्यांना फोन केला आणि हा सीन चित्रपटातून काढून टाकायला सांगितला.

संजय दत्त चित्रपटाचा भाग नव्हता. म्हणून निर्मात्यांनी या गोष्टीला नकार दिला. शेवटी संजय रागारागात चित्रपटाच्या सेटवर गेला आणि त्याने धर्मेंद्रला शोधायला सुरुवात केली. संजयने धर्मेंद्रला शिव्या द्यायला सुरुवात केली.

धर्मेंद्र समोर आले त्यावेळी त्याने त्यांच्यावर हात उचलला. सेटवरील लोकांनी त्याला थांबवले. नाही तर त्या दिवशी धर्मेंद्र आणि संजय दत्तमध्ये भांडण होता होता राहिले. संजयला अशा अवस्थेत पाहून धर्मेंद्र खुप जास्त चिडले. त्यांनी धर्मेंद्रला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

पण संजय ऐकत नव्हता. संजय रागारागात किमी काटकरकडे गेला आणि तो तिच्यावर ओरडत होता. त्यावेळी धर्मेंद्रने संजयला थांबवले आणि त्याला समजून सांगितले. तो ऐकायला तयार नव्हता. तो रागात सेटवरून निघून गेला होता.

असे बोलले जाते की, धर्मेंद्रमूळे किमी काटकर आणि संजय दत्तचे ब्रेकअप झाले होते. ही गोष्ट त्यावेळी खुप जास्त चर्चेचा विषय झाली होती. अनेक ठिकाणी या गोष्टीबद्दल बोलले जात होते. संजयच्या रागीट स्वभावामुळे त्याचे हे नातं देखील तुटले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून अमिताभ बच्चनने घाईघाईत उरकवले होते मुलगी श्वेताचे लग्न

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारे शेखर सुमन कसे झाले टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग

९० च्या दशकातील ‘हा’ अभिनेता तुम्हाला आठवतो का? शेवट होता अतिशय वाईट

प्रीती झिंटामूळे झाला होता सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.