‘संजय दत्तला ‘हा’ मोठा आजार; उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता’

 

मुंबई | बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहटा यांनी मंगळवारी ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. या कॅन्सरवर उपचारासाठी संजय दत्त परदेशात जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो, असे कोमल नाहटा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्वासनाच्या त्रासामुळे संजय दत्तला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, या ठिकाणी संजय दत्ताची कोरोना टेस्टही करण्यात आली होती.

मात्र कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यांनतर संजय दत्तवर आवश्यक उपचार करण्यात आले. नंतर संजय दत्तला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.