बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या ‘KGF 2’ या चित्रपटातील खलनायक अधीराच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. संजय दत्त दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये आहे. त्याने जवळपास सर्वच कलाकारांसोबत काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तने त्याच्या सहकलाकारांबद्दल मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.(Sanjay Dutt calls ‘this’ actress sexy; Ajay, Salman, Akshay also made a big statement)
या कलाकारांमध्ये उर्मिला मातोंडकर, सलमान खान आणि रणबीर कपूरसारख्या लोकांचा समावेश आहे.एका मुलाखतीत अभिनेता संजय दत्तला त्याच्या सहकलाकारांसाठी एक-एक नाव देण्यास सांगितले असता, त्याने मनोरंजक उत्तरे दिली आहेत. संजय दत्त मेगास्टार अमिताभ बच्चन यांना ‘देव’ म्हणतो.
सर्वात ‘सेक्सी’ को-स्टारबद्दल विचारले असता त्याने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे नाव घेतले. संजय दत्त आणि उर्मिलाने ‘दौर’ आणि ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अमिताभ बच्चन आणि उर्मिला यांच्याशिवाय संजयने गोविंदाला त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून वर्णन केले.
संजय दत्तने अभिनेता अजय देवगणचा उल्लेख ‘नम्र’ असा केला आहे. तसेच अभिनेता संजय दत्तने आमिर खानला ‘प्रोफेशनल’, अक्षय कुमारला ‘फनी’ असे म्हंटले आहे. अभिनेता संजय दत्त रणबीर कपूरला मुलगा मानतो. या मुलाखतीत अभिनेता संजय दत्तला तुझा आवडता अभिनेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना संजय दत्तने वडील सुनील शेट्टी यांचे नाव घेतले आहे. अभिनेता संजय दत्त सुनील शेट्टी आणि सलमान खानला भाऊ मानतो. तसेच अभिनेते अमरीश पुरी हे संजय दत्तचे आवडते खलनायक आहेत. KGF 2 नंतर अभिनेता संजय दत्त रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
याशिवाय संजय दत्त पुन्हा एकदा रवीना टंडनसोबत ‘घुडछडी’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. अभिनेता संजय दत्तची भूमिका असलेल्या KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
भीक मागून महिलेने जमवले लाखो रुपये, या पैशांतून केलेलं काम जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
“मला आणि आपल्या मुलांना तुझा अभिमान वाटतो..” पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवलेल्या महिलेच्या पतीचे ट्विट
VIDEO: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोर खाली आला ड्रेस अन्…