सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा(Sanjay Dutt) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो दुबईमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. या फोटोवरून अभिनेता संजय दत्तला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.(sanjay dutt and parvez mushraf meeting in dubai)
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांची भेट दुबईतील एका जिममध्ये झाली होती. ही भेट योगायोगाने झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या फोटोमध्ये परवेझ मुशर्रफ एका व्हीलचेअरवर बसलेले दिसत आहेत. तर अभिनेता संजय दत्त इतर लोकांशी बोलताना दिसत आहे.
पाकिस्तानी मुस्लिम लीग (एन) चे दिग्गज नेते मुस्ताक मिन्हास यांनी हा फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ किंवा बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आलेला नाही. या फोटोबाबत अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
https://twitter.com/ramanmalik/status/1504369116122996741?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504369116122996741%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fbollywood%2Fsanjay-dutt-sanjay-dutt-and-former-pakistani-prime-minister-pervez-musharraf-met-in-dubai-a732%2F
या फोटोमुळे पुन्हा एकदा ट्विटरवर बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड सुरू झाला. या फोटोवरून बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी या फोटोवर कंमेंट्स केल्या आहेत. “हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ याने संजय दत्तची भेट घेतली. हे काय चालू आहे?” अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने सोशल मीडियावर दिली आहे.
दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, “कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय करत आहे. संजयला ड्रग्स, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतात.” 2016 मध्ये झालेल्या पठाणकोट-उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. जानेवारी 2016 मध्ये जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पंजाबमधील पठाणकोट एअर फोर्स स्टेशनवर हल्ला केला होता.
https://twitter.com/gauagg/status/1504308382206816264?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504308382206816264%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fbollywood%2Fsanjay-dutt-sanjay-dutt-and-former-pakistani-prime-minister-pervez-musharraf-met-in-dubai-a732%2F
त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांनी उरी येथील लष्कराच्या छावणीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पूर्णपणे बिघडले होते. पाकिस्तानी कलाकारांना देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :-
नागपुरातील मुलं नसती तर झुंड तयार झाला नसता; नागराज मनजुळेंनी सांगितले मन हेलावून टाकणारे किस्से
‘जवळपास दोन महिने मी नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये हिंडत होतो’, नागराज मंजुळेंनी सांगितला झुंडचा खडतर प्रवास
घाबरू नका, राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, पण..; राष्ट्रवादीच्या आमदारांना पवारांची ग्वाही