मुंबई मनपाचे सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; अन् पुढे…

मुंबई – आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे, तत्पूर्वी शिक्षण विभागाने २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला, सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला, हा अर्थसंकल्प सादर करताना नजरचुकीने घडलेल्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला.

शिक्षण बजेट मांडले जात असताना रमेश पवार यांनीपाण्याची बाटली समजून सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले. यावेळी उपस्थितांनीही सॅनिटाझर प्यायले असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. यानंतर काही वेळासाठी ते तिथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.

दरम्यान, करोना काळात उपाययोजनांमुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे घसरलेले उत्पन्न यामुळे पालिकेचा जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडलेला आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकांमुळे आर्थिक शिस्त लावणे प्रशासनाला शक्य होणार नाही.

तसेच या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये करवाढ, नवीन शुल्क किं वा शुल्कवाढ करणार यासोबतच अर्थसंकल्प तुटीचा की शिलकीचा याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.