महेंद्रसिंग धोनीला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते- सानिया मिर्झा

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावर भारताची टेनिस खेळाडू आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलीकची पत्नी सानिया मिर्झा हिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्पोर्ट्सकीडा’ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असेही म्हटले.

धोनीची इच्छा असती तर तो फेअरवेल सामना खेळला असता आणि मैदानावर उतरुन कारकिर्दीला अलविदा केले असते. परंतु त्याने शांतपणे यापासून दूर जात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

हीच बाब त्याला कॅप्टन कुल बनवते, असे 33 वर्षीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा म्हणाली. तसेच त्याने स्वतःसाठी नाही तर देशासाठी खूप काही कमावले, असेही सानिया म्हणाली.

त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असे सानिया म्हणाली. धोनी आणि शोएब मलिक यांनी पर्सनॅलिटी सारखीच असल्याचे सानिया म्हणते.

मैदानावर दोघेही शांत राहतात, त्यांच्यात बऱ्याच समानता आहेत, देशाचे नाव दोघांनीही मोठे केले आहे. असेही सानिया यावेळी म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

-“प्रशांत भूषण यांनी आपल्या मनातील प्रश्नांना वाचा फोडलीय, त्यांच्या पाठीशी निर्भयपणे उभे रहा”

डॉक्टरांची सीबीआयकडे कबुली; मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी घाई केली, त्यामुळे.. 

-‘या’ प्राण्यांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका! अखेर शास्रज्ञांनी शोधून काढलेच..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.