किलोने सोने घालनारा गोल्डमॅन माहेरून गृहोपयोगी वस्तू आणण्यासाठी करतोय बायकोचा छळ

सोन्याचे शूज, गळ्यात अर्धा किलो सोनं, हातात सोन्याचे कडे, ब्रेस्लेट, कारला सोन्याची नंबर प्लेट या सर्व गोष्टीसाठी प्रसिद्ध असणारा गोल्डमॅन पुण्याचा सनी वाघचौरे एका घरगुती वादात सापडला आहे. अंगावर एवढं सोनं असणाऱ्या सनी आणि त्याच्या परिवाराने सनीच्या बायकोचा गृहोपयोगी वस्तूंसाठी छळ केल्याचा आरोप आहे.

सनीवर गुन्हा दाखल करणारी ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आई-वडिलांकडून गृहोपयोगी वस्तू आणाव्यात यासाठी त्याने पत्नीचा छळ केला असल्याचा आरोप आहे.

पत्नी गर्भवती असताना गर्भपाताची औषधं देऊन गर्भपात केल्याचा, तसेच २०११ पासून सनीने आणि त्याच्या आई वडील आणि बहिणीने सनीच्या बायकोचा छळ केला आहे. मारहाण, शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. असा गुन्हा ही पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने दाखल केला आहे.

खरं म्हणटलं तर सनी जे दागिने घालून मिरवतोय त्यापैकी अनेक दागिने हे पहिल्या पत्नीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. सोन्याच्या दागिने दाखवून त्याने काही महिलांना जाळ्यात खेचलंय. दुसऱ्या पत्नी सोबत राहत असतानाच तो तिसऱ्या महिलेला घरी घेऊन यायचा.

सनी नेहमीच बॉलिवूडमधील कलाकारांसोबत दिसतो. इतकेच नाही तर बॉलिवूड स्टार विवेक ओबेरॉय त्याचा खास मित्र आहे. विवेक जिथे जाईल तिथे सनी त्याच्यासोबत राहतो. जेव्हा विवेक ओबेरॉय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता, तेव्हा सनीदेखील तिथे होता.

एका चित्रपटात त्याने त्याच्याबरोबर स्क्रीनही शेअर केली आहे. सनीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आता त्याला अटक होणार का हे पाहाणं महत्त्वाचे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.