अभिनेता संग्राम समेळच्या दुसऱ्या लग्नाचा थाटमाट, ‘या’ खास व्यक्तीशी घेतले सात फेरे; पहा फोटो

मुंबई | मराठी मनोरंजन विश्वातल्या कलाकारांनी लॉकडाऊनंतरच्या काळात लग्नाचा धुमधडाका लावला आहे. यामध्ये आता ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ याने सुद्धा लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

संग्राम समेळ याने २०१६ साली ‘रुंजी’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत विवाह केला होता. लग्नानंतर त्याच्यात काही खटकल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता संग्राम याने पुन्हा दुसरं लग्न केल्याचे पाहायला मिळते आहे.

आता अभिनेता संग्राम समेळ याने डान्सर श्रद्धा फाटक हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धा यांचा विवाह काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

संग्राम आणि श्रद्धाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, संग्राम हा ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ‘समीर’ च्या भूमिकेत घराघरात पोहचला आहे.  याशिवाय संग्रामने अनेक चित्रपटात काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मानसी नाईकनंतर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता अडकली विवाहबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो
अबब! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री पाचव्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत; बॉडीगार्डसोबत बांधली लग्नगाठ
दिलदार हिरो! आजीबाईंची हाक ऐकून रणवीर सिंगने लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.