जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

मुंबई : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला दणका बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहे. सूर्यवंशी यांना ३९ मतं पडली तर भाजप च्या धीरज सूर्यवंशी यांना ३६ मतं मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.

दरम्यान, सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मतदान झाल्याने याबद्दल उत्सुकता होती. राष्ट्रवादीने भाजपला धक्का देत आपला झेंडा फडकावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बाबा रामदेव यांना अटक होणार? WHO म्हणते, ‘आम्ही प्रमाणपत्र दिलं नाही’
करोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा; IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
लॉकडाउनचा अनुभव सांगताना अजित पवारांनी केले कळकळीचे आवाहन; ‘कृपा करा…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.