Sangli Crime news: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटात परस्पर आरोप-प्रत्यारोप रंगले असून, प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सुहास बाबर (Suhas Babar) यांच्या समर्थकांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून बाबर यांनी पोलिसांवर दबाव टाकून तपासात हस्तक्षेप केला, असा आरोप करत त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आटपाडी पोलिस (Atpadi Police) स्टेशनमध्ये निवेदनही देण्यात आले आहे.
दुसरीकडे, शिवसेना (Shinde Group) शिंदे गटाकडूनही आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व त्यांच्या बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी गृहविभागाकडे सखोल तपासासाठी सूचना पाठवावी, अशी विनंती केली आहे.
सांगलीत खळबळजनक खूनाची घटना!
सांगलीतील कुपवाड (Kupwad) परिसर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. अमोल रायते (Amol Rayate) या युवकाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्र आणि मोठा दगड वापरून निर्घृण हत्या केली आहे. रामकृष्ण नगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ (Swami Samarth Temple) रात्री ही घटना घडली.
कुपवाड औद्योगिक पोलिस (Kupwad Police) घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर (Deepak Bhandwalkar – API) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरार असून, शोध सुरू आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात खूनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे यांचे वक्तव्य
विटा (Vita) येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप (BJP) कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक करताना विशेष उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की, “पडळकर हे मुद्द्यावर ठाम राहतात, पण गरज पडल्यास गुद्यानेही लढायला तयार असतात. माझ्या खात्यातील सारा कोटा मी त्यांच्या कामासाठी वापरायला तयार आहे.” यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचल्याचा संदर्भही दिला.
जयकुमार गोरे यांनी पुढे म्हटले की, “गोपीचंद पडळकर हे बहुजनांचे खरे नेते आहेत. ते जनतेच्या व्यथा मांडतात आणि त्यासाठी लढतात. अशा नेत्यांना संधी मिळाली पाहिजे.”