गर्दी केल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसाला जमावाची पाठलाग करुन जबर मारहाण; पहा व्हिडीओ

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने कहर घातला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण घालण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आलेले आहे. असे असले तरी राज्यात अनेक लोक बाहेर फिरताना दिसून येत आहे.

त्यामुळे पोलिस रिकाम्या फिरणाऱ्यांवर, विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. पण काही लोक पोलिसांनाच मारहार केल्याच्या घटना घडत आहे. आता अशीच एक घटना घडली असून आता त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी करणाऱ्या लोकांना जाब विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेर शहरात लोकांना गर्दी करण्यास पोलिसांनी मनाई केली होती.

असे असतानाही पोलिसांनी गर्दी केली होती. तेव्हा काही लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी जाब विचारला असता, काही लोकांनी त्यांनाच मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये लोक पोलिसांचा पाठलाग करुन त्यांच्यावर दगडफेक करताना दिसून येत आहे. पोलिस स्वत:चा बचाव करत असताना पळत आहे, तर लोक त्यांच्या पाठी मागे येऊन त्यांच्यावर दगडफेक करत आहे.

दिल्ली नाका परिसरात काही लोकांनी गर्दी केली होती. अशात संचारबंदी असतानाही लोकांनी गर्दी केल्याने पोलिस गर्दी करणाऱ्या लोकांना जाब विचारत होती. मात्र जाब विचारल्याने तिथल्या लोकांनी थेट पोलिसांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच यावेळी लोकांनी पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

जास्मीन भसीनने अशी केली आत्महत्येच्या विचारांवर मात; जाणून घ्या तिच्या कठीण प्रसंगांविषयी
दुःखद! भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी आदिरा आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टार किड; बर्थडेला गिफ्ट मिळाला बंगला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.