अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर संदीप देशपांडेंची तुरी, वाचा नेमकं काय घडलं?

सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे(MNS) नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. काल मुंबई पोलिसांकडून मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेण्यात आले होते.(sandip deshpande escape from hand of mumbai police)

त्यानंतर मनसेच्या अनेक नेत्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना आज मुंबई पोलीस अटक करण्यासाठी प्रयत्न आले होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना चकवा दिला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यामुळे काही वेळ पोलिसांचा गोंधळ उडाला होता.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासोबत असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस कालपासून मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शोध घेत होते. आज मनसे पक्षाकडून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात येणार होते.

आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मनसे नेते संतोष धुरी देखील होते. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाणार होते. त्यापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.

त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले आणि त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी संदीप देशपांडे यांना पोलीस व्हॅनकडे घेऊन जात होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे घुमजाव करत पोलिसांना त्यांच्या गाडीकडे घेऊन गेले.

त्यानंतर संदीप देशपांडे यांनी गाडीत बसून त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमधून पोलीस मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण
शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप, म्हणाली, ‘माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी स्टार बनली’
‘आई वडील करत आहेत फोन, पण मी ९ वर्षांपासून घरी गेलो नाही’, वाचा कुमार कार्तिकेयचा संघर्षमय प्रवास