Share

Sandeep Deshpande : एवढा धोका देणाऱ्या लोकांवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. “महाराष्ट्राच्या हितासाठी मी भांडण विसरून एकत्र यायला तयार आहे, पण उद्धव ठाकरेंनीही पुढाकार घेतला पाहिजे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यावर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर दोघांचा एकत्र फोटो असलेला भावनिक व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

मात्र युतीच्या चर्चेत आता मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande,) यांनी थेट भूमिका घेत कठोर शब्दांत आपला विरोध नोंदवला आहे. “इतक्या वेळा विश्वासघात करणाऱ्या लोकांवर आम्ही विश्वास ठेवायचा कसा?” असा थेट सवाल करत त्यांनी शिवसेनेवर परखड टीका केली.

देशपांडे(Sandeep Deshpande,) म्हणाले की, “तुम्ही आम्हाला वाईट ठरवून एकत्र येऊ शकत नाहीत. जेव्हा आम्ही कुणाला जेवायला बोलावतो ते चुकीचं, पण तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांशी गोड बोलता ते योग्य? ही दुटप्पी भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना पटत नाही.”

तसंच, 2017 मध्येही युतीचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. “तेव्हा उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते, भाजपसोबतचं आमचं ‘लग्न’ संपल्यावर आपण बोलू. पण भाजपसोबत युती तोडल्यानंतरही त्यांनी संवाद टाळला. त्यानंतर 2014 मध्येही असाच प्रकार झाला होता,” असं नमूद करत त्यांनी शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप केला.

2019 च्या घटनांचा उल्लेख करत ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांनी भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. पण जर एक वर्षासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर भाजप हा महाराष्ट्रद्रोही ठरला असता का? हे प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावेत.”

ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना(Raj Thackeray) युतीसाठी एक अट घालण्यात आली आहे – “भाजप व शिंदे गटाशी संबंध नसावेत.” मात्र यावर संदीप देशपांडे यांनी टीका करत, “सत्तेसाठी केलेले व्यवहार लक्षात घेतल्यास या अटी हास्यास्पद वाटतात,” असं स्पष्ट केलं.

राज(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावर राज्यात चर्चांना जोर चढला असताना, संदीप देशपांडेंच्या(Sandeep Deshpande,) या स्पष्टवक्तेपणामुळे युतीच्या शक्यतेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या चर्चांचा पुढील प्रवास राजकीय स्तरावर कोणती दिशा घेतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
sandeep-deshpande-questions-thackeray-brothers-reunion

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now