उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने(BJP) मोठा विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला २५५ जागा मिळाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाला(Samajvadi Party) १११ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष सपशेल अपयशी झाल्याचे स्पष्ट होत आहे.(samjvadi party tweet about voting percentage in uttar pradesh )
पण यादरम्यान समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबद्दल धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला २.९ कोटी मते मिळाली आहेत, असा दावा सपाच्या नेत्यांनी केला आहे. आमचा पराभव कमी मतांनी झाला आहे, असे सपाच्या नेत्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाला २.९ कोटी मते मिळाली आहेत. आम्हाला फक्त ५ लाख जास्त मते मिळाली असती तर आमचे सरकार यूपीत बनले असते! संपूर्ण समर्पणाने जनतेची सेवा करून समाजवादी संघर्षाच्या मार्गावर चालत राहतील.”
https://twitter.com/samajwadiparty/status/1502238829667024897?t=gtR_wsRuC4RX1fPS1gOnmg&s=19
समाजवादी पक्षाचे पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही पक्षाच्या जागा वाढवल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच अखिलेश यादव यांनी निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढवल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी केल्या जाऊ शकतात. हे आपण या निवडणुकीत दाखवून दिलं आहे”, असे म्हणत अखिलेश यादव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं. अखिलेश यादव यांनी शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीबद्दल एक ट्विट केलं आहे.
या ट्विटमध्ये अखिलेश यादव यांनी लिहिलं आहे की, “आमच्या जागा २.५ पट आणि मतदानाची टक्केवारी १.५ पट वाढवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. भाजपच्या जागा कमी होऊ शकतात हे आम्ही दाखवून दिले आहे. भाजपच्या जागांची ही कमतरता कायम राहणार आहे. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला आहे. उरलेला संभ्रम देखील काही दिवसात निघून जाईल. जनहिताचा लढा जिंकेल.”असे ट्विट त्यांनी केलं आहे.
समाजवादी पक्षाचे पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी आणखी एका ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये पक्षाच्या विजयी आमदारांचे अभिनंदन केलं आहे. त्या ट्विटमध्ये अखिलेश यादव म्हणाले की, “सपा-गठबंधनमधील सर्व विजयी आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्व नवीन आमदारांनी जनतेची सेवा आणि मदत करण्याची आपली १००% जबाबदारी पार पाडावी. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, बेरोजगार युवक, शिक्षक, शिक्षण मित्र, महिला, वृद्ध पेन्शनचे समर्थक, शेतकरी, मजूर आणि व्यावसायिक यांचे आभार”, असे अखिलेश यादव ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
नवज्योत सिद्धू जज असताना त्यांच्यासमोर कॉमेडी करायचे भगवंत माने, आता त्यांना हरवून होणार मुख्यमंत्री
ते मला सोडून गेले, त्यांनी मला साथ दिली नाही, त्यामुळे.., अर्षद वारसीचा अमिताभ बच्चनबद्दल मोठा खुलासा
अक्कलकोटला दर्शनासाठी आलेल्या पाच भाविकांचा अपघातात जागीच मृत्यू ,तर दोन जण गंभीर जखमी