Share

स्वतःच्या घरावर भाजपचा झेंडा बघून सपा उमेदवाराला बसला धक्का; रडत-रडत पडला बेशुद्ध, पहा व्हिडिओ

narad-rai

सध्या उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधुम सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून बुधवारी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. यादरम्यान, समाजवादी पक्षाच्या(Samjvadi Party) उमेदवाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो उमेदवार त्याच्या घरावर भाजपचा(BJP) झेंडा फडकताना पाहून रडताना दिसत आहे.(samjavadi party mla candidate crying on seeing bjp flag on his house)

समाजवादी पक्षाचे उमेदवार नारद राय बलियाच्या सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नारद राय सध्या आपल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. सोमवारी ते सदर विधानसभा मतदारसंघातील खोडी पकड गावात सभा घेत होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार नारद राय त्यांच्या ताफ्यासह प्रचारासाठी वडिलोपार्जित घरासमोर आले होते.

त्यावेळी नारद राय यांना त्यांच्या वडिलोपार्जित घरावर भाजपचा झेंडा फडकताना पाहून मोठा धक्का बसला. हे दृश्य पाहून ते रडू लागले. घरावर भाजपचा झेंडा पाहून सपाचे उमेदवार नारद राय म्हणाले की, “तुम्हाला आमच्या घराला आग लावायची आहे. आमच्या घराला आग लावणारे लोक कधीही सुरक्षित राहणार नाहीत.”

https://twitter.com/iamPT7/status/1496067396477812746?t=TfrY84gm0Z6PAWCGr3E_ig&s=19

आपल्या वडिलोपार्जित घराकडे बोट दाखवत नारद राय पुढे म्हणाले की, “हे आमचे घर आहे, आमच्या घरावर भाजपचा झेंडा लावणाऱ्या लोकांनी मला दुःख दिले आहे. ते लोक सुरक्षित राहणार नाहीत. मला कोणाचे नुकसान करण्याची इच्छा नाही. मी देवाला प्रार्थना करतो की, कोणाचे वाईट विचार करू नकोस. पण माझ्यासोबत नेहमीच चुकीचे घडत आहे.”

हे भाषण झाल्यानंतर रडत रडत समाजवादी पक्षाचे उमेदवार नारद राय प्रचाराच्या टेम्पोमध्येच कोसळले. समाजवादी पक्षाचे उमेदवार नारद राय यांचे भाऊ वशिष्ठ राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ते भाजप पक्षावर नाराज आहेत. नारद राय हे बलियाच्या सदर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत शेतकऱ्यांनी शेकडो बैल सोडले होते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेश राज्यात भाजप पक्षाला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसशी लढा द्यावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात? मुंबईत डेटवर जातानाचे फोटो व्हायरल
PHOTO: शक्तिमानमध्ये मुकेश खन्नाची जागा घेणार ‘हा’ टीव्ही अभिनेता? नाव वाचून अवाक व्हाल
गणिताच्या तासाला बाईंकडे एकटक पाहत बसायचा हेमंत ढोमे, एकदा बाईंना कळलं अन्.., वाचा भन्नाट किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now