संभाजी भिडे सर्वात बावळट व्यक्ती; अशा सडक्या मेंदूची विकृत पैदास वेळीच ठेचली पाहिजे

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोना हा रोग नसून त्याने मरणाऱ्या माणसांची जगण्याची लायकी नाही, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

मूळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाही. कोरोना हा रोग नाही, हा ** वृत्तीच्या लोकांना होणार रोग आहे, असे त्यांनी म्हटले आहे., हे बोलताना त्यांची जीभ घसरल्याने राज्यभरातून त्यांच्यावर टिका होत आहे, आता याच वक्तव्यावरुण संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील सर्वात बावळट व्यक्ती म्हणजे संभाजी भिडे आहे. हा विकृत माणूस महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, अशा सडक्या मेंदूची विकृत पैदास वेळीच ठेचली पाहिजे, असे म्हणत संतोष शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या लोकांच्या कुटुंबांचा अपमान संभाजी भिडे यांनी केला आहे. या महामारीच्या काळात २४ तास सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणेचा सुद्धा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने अपमान झाल्याचे संतोष यांनी म्हटले आहे.

अशा वादग्रस्त आणि बावळट माणसावर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशा माणसाला पाठिशी घालू नये, अशा देशद्रोही माणसाची जीभ छाटली पाहिजे, असेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-
‘पुढच्या वेळेस कोर्टात जाताना मलम सोबत न्या, म्हणजे सुजलेले व काळे तोंड लपवता येईल’

कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

सनी देओलला चित्रपटात घेतले तर पुढच्या चित्रपटात धर्मेंद्र फुकट काम करणार; बाप लेकाची अजब ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.