बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) अटक केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडे(Sameer Wahkhede) यांना मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईमधील(Navi Mumbai) समीर वानखेडे यांच्या मालकीचा सद्गुरू हॉटेल अँण्ड बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.(Sameer wankhede bar license cancelled)
एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्या मालकीचा नवी मुंबईतील वाशी येथे एक रेस्टो बार आहे. या रेस्टो बारचे नाव सद्गुरू हॉटेल अँण्ड बार असे आहे. १९९७ मध्ये समीर वानखेडे यांनी या बारचा परवाना मिळवला होता. पण त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. या बारचा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे.
समीर वानखेडे यांच्या जन्मतारखेमध्ये विसंगती असल्याचे कारण देत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बारचा परवाना रद्द केला आहे. एनसीबीतील बदलीनंतर समीर वानखेडे यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अवैधरित्या बार आणि परमिट रुमचा परवाना मिळवला आहे, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
अल्पवयीन असताना समीर वानखेडे यांनी बार परमीट रुमचे लायसन्स घेतले होते. यूपीएससीत नोकरीत असताना स्वत:चा बार सुरु केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील गोंधळानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागामध्ये बदली करण्यात आली आहे.
बारचा परवाना रद्द केल्याच्या प्रकरणावर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेमध्ये रुजू झाल्यापासून या बारचा परवाना आपल्या नावे आहे, असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे. या बारचा परवान्याबाबतचे कायदेशीर हक्क समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत.
२००६ पासून या बारचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. या बारच्या परवान्याचा उल्लेख माझ्या संपत्तीच्या हिशोबात देण्यात आला आहे, असे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले आहे. या बारमधून मिळणाऱ्या कमाईचा उल्लेख प्राप्तिकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलिसानेच केले अपहरण; असा आखला होता प्लॅन
दादागिरी आली अंगलट! पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
‘भाजपवाले गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत’ उत्तर प्रदेशचे मोदी लढणार निवडणूक