‘हात जोडून विनंती करतो की..’; मराठी दिग्दर्शकाने प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे सावट आहे. आता पुर्णपणे कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. सिनेमागृहे, नाट्यगृह ५० टक्क्यांनी खुली करण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांना आता सिनेमागृहात सिनेमे बघता येणार आहे. हिंदी चित्रपटांना राज्या चांगला प्रतिसाद मिळत असून ते करोडोंनी कमाई करताना दिसून येत आहे. असाच प्रतिसाद मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांनी द्यावा, अशी विनंती मराठी दिग्दर्शकाने केली आहे.

कोरोना काळात कलाकारांचे खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी चित्रपटात गृहात येणाऱ्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केली आहे. तुमचा प्रतिसाद बघायला सर्व मराठी कलाकार आसूलेले आहे, असे समीर विद्वांस यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत त्यांनी ही विनंती केली आहे.

प्रेक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे, की त्यांनी मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा. नाही आवडलं तर तसं सांगा, तो तुमचा हक्क आहे. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर आपली मराठी चित्रपटसृष्टी परत एकदा धावायला लागेल, असे समीर विद्वांस यांनी म्हटले आहे.

ट्विट केलेली पोस्ट-
गेलं दीड वर्ष सगळ्यांसाठीच आर्थिक गणित कोलमडून टाकणारं गेलंय, अजूनही जातंय, मनोरंजन क्षेत्रही ह्यातून सुटलं नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडतायत. करोडोची गुंतवणूक २ वर्ष अडकून आहे.

त्यावर अनेकांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि आत्ता कुठे गाडी यार्डातून बाहेर येत्ये. पण ती नीट रुळावर आणणं पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या हातात आहे. एकीकडे हिंदीचे १५० करोड पार आकडे बघताना मनापासून वाटतं की असाच भरघोस हाऊसफूल प्रतिसाद मराठी चित्रपटांनाही

मिळावा! ते चित्र बघायला आणि अनुभव घ्यायला आम्ही सर्व कलाकार आणि मंडळी आसूसलोय! खरंच! पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा येणारे मराठी चित्रपटही प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन पाहतील. तसं घडतं तर ते ‘तूफान हाऊसफूल’ दिवस दूर नाहीत.

खरंच सांगतो आम्हा सगळ्या कलाकारांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी चित्रपट शक्य तितके चित्रपट गृहात जाऊनच बघा. नाही आवडले तर तसं मोकळेपणाने सांगाच, तो तुमचा हक्कंच आहे पण तूम्ही जर भरभरून प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपली मराठी चित्रपट सृष्टी परत एकदा हळू हळू रांगायला.. चालायला आणि मग धावायला लागेल. ह्याच बरोबर राज्यसरकारलाही विनंती आहे. बाकी सगळं अगदी नीट व्यवस्थीत सुरू झालंय तर मग चित्रपट आणि नाट्यगृहही पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरु करावी.

महत्वाच्या बातम्या-
ऐकावे ते नवलच! आता १ किलोमीटर लांबून वापरा वायफाय; सर्व कामे होतील अगदी काही मिनीटांत
‘सुर्यवंशी’ चित्रपटावर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली, चांगल दाखवता येत नसेल तर..
..तरच खड्ड्यातून बाहेर येईल, सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर परमबीर सिंगांचे उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.