टिकटॉक स्टार समीर गायकवाडच्या आत्महत्येआधीचा व्हिडीओ आला समोर, व्हिडीओत म्हणाला…

पुणे | पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडने आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या हटके स्टाईलमधील व्हिडीओ आणि डायलॉगने तरूणायीची मनं जिंकली आहेत. अशात समीरने आत्महत्या करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडीओंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

टिकटॉकनंतर समीर इंन्स्टाग्रामवर खुप ऍक्टिव्ह होता. इंन्स्टावरील त्याचे व्हिडीओ सोशल मीडिया युझर्समध्ये खुप पसंत केले जात होते. व्हिडीओमधील त्याचे डायलॉग आणि स्टाईलचे अनेक लोक दिवाणे आहेत. तर त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओंचा पुर आला आहे.

समीरने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेवटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओत तो निराश असल्याचे अजिबात जाणवत नाही. तो पुर्वीसारख्याच स्टाईलमध्ये शेवटचा व्हिडीओ करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो लोकांना एकमेकांना मागे न खेचता सहकार्य करून पुढं कसं जाता येतं, याबद्दल सांगत आहे.

समीरने शेवटची पोस्ट खूप सकारात्मक शेअर केली आहे. परंतु इतरांना सकारात्मक विचार सांगणाऱ्याने स्वत:च हे टोकाचे पाऊल उचलले आहे. समीरने हा चुकीचा निर्णय घेतला असल्याच्या भावना त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावरील आपल्या व्हिडीओने तरुणायीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या समीर गायकवाडने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. समीरने अचानक उचललेल्या या पाऊलामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर स्टार असणाऱ्या समीर मनीष गायकवाड (वय २२) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता २१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यानंतर समीरचा भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने याप्रकरणाची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली होती.

समीरने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर त्याला खाली घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे नेमके स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-
टिकटॉक स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, नक्की आत्महत्येचे कारण काय?
काय सांगता! सरकारचे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर ३० हजार तर चारचाकी खरेदीवर १ लाख ५० हजारांचे अनुदान
अंकिता लोखंडेचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या फॅन्संनी केलं ट्रोल
पवार, फडणवीसांच्या उपस्थीतीत भाजप नेत्याच्या मुलाचा शाही विवाह? सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.