पुणे | सोशल मीडियावरील आपल्या व्हिडीओने तरुणायीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या समीर गायकवाडने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. समीरने अचानक उचललेल्या या पाऊलामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर स्टार असणाऱ्या समीर मनीष गायकवाड (वय २२) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (ता २१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यानंतर समीरचा भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने याप्रकरणाची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली आहे.
समीरने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर त्याला खाली घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे नेमके स्पष्ट कारण समोर आले नाही.
समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. टिकटॉकनंतर इंन्स्टाग्रामवर त्याच्या अनेक व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंत मिळत होती.
सोशल मीडियावरील स्टार असला तरी चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ मोठ्या पडद्यावरील स्टार पेक्षा कमी नव्हती. त्याच्या जाण्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये; जाणून घ्या कारणं
आठ महिन्यातील सगळ्यात स्वस्त दराने मिळतय सोने; आताच खरेदी करा, पुढे वाढणार भाव
कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच माहीत होतं; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर