श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत हजारांच्या संख्येवर तरुण जुळले आहेत.
श्री शिवतीर्थ धारातीर्थी गडकोट मोहिमेला श्री क्षेत्र भीमाशंकर पासून ते शिवनेरी किल्ला पर्यंत सुरवात झाली आहे. सभांजी भिडे गुरुजींच्या उपस्तिथीतीत या मोहिमेला सुरवात झाली आहे. २८ जानेवारीपासूनच शिवप्रतिष्ठानचे धारकरी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी निघाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ३५-४० हजार धारकरी या मोहिमेसाठी भीमाशंकर येथे रवाना झाले आहेत. भीमाशंकर येथे रविवारी पहाटेच आरती करण्यात आली. या आरतीनंतर सांगली, सातारा, कोल्हापूर मधून आलेल्या धारकर्यांनी शिवनेरीची वाट धरली. महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातलेही धारकरी यात सहभागी झालेले आहेत.
या मोहिमेसाठी जमलेले सर्वच धारकरी भिमाशंकरपासून सुरवात करून जंगलाची वाट धरत शिवनेरीकडे पाऊलं टाकली आहेत. या धारकऱ्यांच्या पहिला मुक्काम आहुपे येथे होणार आहे. भिमाशंकरपासून कोंढवळ मार्गे भट्टी या जंगलापासून सुमारे २०-२५ किमी अंतरावर हे गाव आहे.
तसेच दुसरा मुक्काम वरसुबाई सुकाळ वेढे येथे असून किल्ले शिवनेरीवर तिसरा मुक्काम होणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी भीमाशंकर येथून या मोहिमेसाठी निघाले असता वाटेत त्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.
या मोहिमेत हजारोंच्या संख्येने धारकरी सहभागी झाले असून शिवनेरीकडे पायी चालत निघाले आहेत. भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी अशी ही मोहिम असणार आहे. गडकोटाचे संवर्धन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा प्रचार आणि प्रसार हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
Sambhaji Bhide : भिडे गुरुजी म्हातारे वाटले म्हणून मुर्तींनी नमस्कार केला, त्या भिडेंना ओळखतही नाहीत; आयोजकांचा दावा
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भिडे गुरुजींवर मुस्लीम डॉक्टराने केले उपचार; स्वत:चा पुरस्कार सोहळा केला रद्द
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भर रस्त्यात फ्रिस्टाईल हाणामारी; मशाल रॅलीच्या स्वागतावरून झाला वाद