मोठी बातमी! भाजपला रामराम ठोकून संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी नवीन पक्ष स्थापन करणार?

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. याचदरम्यान, आता अशा चर्चांना उधाण आले आहे की खासदार संभाजीराजे छत्रपती नवीन पक्ष स्थापन करू शकतात. त्यामुळे ते खासदार पदाचा राजीनामा देतात की काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

कारण सध्या संभाजीराजे वर्षा निवास्थानावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर संभाजीराजे काय निर्णय घेतील यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करू शकतात आणि मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच सोशल मिडीयावर कॅम्पेनही चालवण्यात येत आहे ज्यामध्ये मराठा समाजाला सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षणाच्या लढ्याला नव्याने सुरूवात करण्याची मागणी होत आहे. राजकीय पक्षांची बैठक घेऊन कोरोना संपल्यावर हा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे हे भाजपला रामराम ठोकू शकतात. तसेच ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात आणि पुन्हा आपले खासदारकीचे पद मिळवू शकतात. दरम्यान दुपारी ५ वाजता संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार होते.

संभाजीराजे उद्या प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात काय चर्चा चालू आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वर्षा या शासकीय निवासस्थानावर सुरू असलेल्या बैठकीला अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.

यामध्ये अशोक चव्हाण यांच्यासमवेत राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या आगोदर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. आता त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या
लवकरच रोहीत शर्माला टिम इंडीयाचा कॅप्टन करणार; बीसीसीआयच्या माजी सिलेक्टरचे वक्तव्य
डॉक्टर म्हणाले, दोन दिवसांपेक्षा जास्त आजी जगणार नाही, पण आजीने सर्वांना चुकीचे ठरवले
तुमच्या लाडक्या लक्ष्याची मुलगी स्वानंदी सौंदर्यात देते मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मात; पहा तिचे सुंदर फोटो
मधमाश्यांनी उघडले बाटलीचे झाकण, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.