मराठा आरक्षणासाठी मोदींना चारवेळा पत्र दिले, पण त्यांनी अजूनही भेटीसाठी वेळ दिली नाही-संभाजीराजे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा घेतल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच विरोधी पक्षाकडून वारंवार राज्य सरकारवर टिका केली जात आहे. तसेच ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात नीट भुमिका मांडता आली नाही, असेही भाजप नेते म्हणत आहे.

अशातच या सर्व प्रकरणावर आता संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणा संदर्भात भाजपने त्यांची भुमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळत बसण्यापेक्षा त्यावर तोडगा सांगावा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तसेच गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट भुमिका मांडली नाही. याच्याशी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार फक्त एकमेकांवर ढकला ढकली करत आहे, असेही संभाजी राजे यांनी म्हटले आहे.

आंदोलन काय असते, हे इतरांनी मला शिकवू नये. मराठी समाजाची दिशाभूल कराल, तर संभाजी महाराज आडवा येईल, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. गुरुवारी नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मी महाल सोडून राज्य पिंजून काढत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. प्लेगच्या साथीच्या वेळेस पण शाहू महाराजांनी असाच संयम दाखवला होता. आक्रमक लगेच होता येते, पण मयत झाली तर त्याला जबाबदार कोण शाहूंचा वंशज? असाही प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलेले लोक आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर २७ तारखेला मी भुमिका मांडेल. एकदा मी पाय पुढे टाकला तर माघार घेणार नाही, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

या पत्रकारपरिषदेत संभाजीराजे यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. तसेच नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा पत्र लिहिले, पण त्यांनी अद्यापही मला भेटीसाठी वेळही दिलेली नाही, असे संभाजीराजे यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाहूणे म्हणून लग्नाला आले, अन् बेडूक उड्या मारत गेले; लग्नाला गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी दिली शिक्षा
कोरोनाग्रस्त आईला मुलगा व सून रुग्णालयात सोडून गेले; नर्सने आईसारखे सांभाळले आणि..
VIDEO: पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा हॉट अंदाज, बिल्लो राणी गाण्यावर केला बेली डान्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.