संभाजीराजेंचा साधेपणा, ताफा थांबवून शेतात केलं जेवण; पहा व्हिडिओ

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्नमार्गी लागण्यासाठी ते सध्या महाराष्ट्र दौरा करत आहे. शनिवारी संभाजीराजेंनी कोपर्डीला भेट दिली होती.

आता महराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांचा प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कितीसाधे आहेत. हे दिसून येत आहे. ते एका शेतात बसून जेवण करतना दिसत आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी अहमदनगरमधील कोपर्डी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. त्यावेळी प्रवासात सर्वांना भुक लागल्यामुळे संभाजीराजेंनी ताफा रस्त्याच्या एका बाजूला घेतला.

संभाजीराजेंनी हा ताफा शेताच्या बाजूला थांबवला होता. तिथे संभाजीराजे जेवणासाठी शेतामधील औतावरच बसले. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी शेतातच जेवण केले. संभाजीराजेंनी शेतातल्या औतावर बसून जेवण केल्याने त्यांच्या साधेपणाची सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

दरम्यान, शनिवारी संभाजीराजेंनी कोपर्डी अत्याचार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा केली. आपल्याला न्याय मिळावा अशी भावना पीडित कुटुंबाने संभाजीराजे यांच्यासमोर व्यक्त केली होती.

त्यावेळी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. तसेच सरकार स्पेशल बेंच स्थापन करुन खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रोज सकाळी हा सोपा उपाय करा; पुरुषांच्या लैंगिक समस्या तत्काळ होतील दूर
इंडिअन आयडल १२: अरुणीता कांजीलालनं गायलं राणू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियाला झाले अश्रू अनावर
VIDEO: नवरी बाजूला असताना मेहूणीनेच मारला नवरदेवावर चान्स; भरलग्नात घेतला नवरदेवाचा किस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.