अभ्यासू व्यक्तीमत्व, छत्रपतींचे वंशज, आक्रमक शैली, वाचा मराठ्यांच्या ढाण्या वाघाबद्दल..

कोरोना सोडला तर जर राज्यात सगळ्यात जास्त तापलेला कोणता मुद्दा असेल तर तो आहे मराठा आरक्षणाचा. राज्य सरकारने जे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मराठा समाजाला दिले होते ते आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

आरक्षण रद्द झाल्याने आता पुन्हा या मु्द्द्यावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. मराठा समाजाच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये आघाडीच्या नेत्यांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे नाव आहे.

त्यांच्या मागे एक खु मोठा जनसमुदाय आहे. त्यामुळे ते या लढाईचे नेतृत्व करतील अशी चिन्हे दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल काही माहिती सांगणार आहोत.

संभाजीराजे छत्रपती हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. कोल्हापुर संस्थानाची धुरा सांभाळणाऱ्या शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे चिरंजीव आहेत.

संभाजीराजेंचा जन्म ११ फेब्रुवारी १९७१ रोजी झाला होता. त्यांचे शिक्षणही कोल्हापुरात आणि राजकोट येथे झाले आहे. त्यांनी २००९ साली पहिली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती.

पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर भाजपकडून त्यांना राष्ट्रपतीनियुक्तीसाठी म्हणून शिफारस आली होती. त्यावेळी त्यांना संधी मिळाली होती. राज्यसभेवर जाणारे ते कोल्हापुरचे पहिले खासदार ठरले होते.

मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांनी आपल्या मागे खुप मोठा जनसमुदाय उभा केला आहे. त्यांचे अनेक तरूण समर्थक आहेत.

फक्त छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांची ओळख नसून त्यांच्याकडे एक वेगळा करिष्मा आहे. याशिवाय संयमी आणि अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेले संभाजीराजे एक आक्रमक धडाडीचे नेते आहेत.

मराठा समाजाशी आणखी एका गोष्टीमुळे ते जोडले गेले आहेत. ही गोष्ट म्हणजे संभाजीराजे दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन करतात. मागील १५ वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन करत आले आहेत.

या सोहळ्याला दरवर्षी हजारो मावळे येत असतात. याशिवाय रायगडाशी निगडीत अनेक उपक्रम ते राबवत असतात. या सगळ्या गोष्टींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे शिवप्रेमींच्या मनात त्यांचे एक वेगळे स्थान आहे.

त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये प्रसिद्ध आहेत. एकदा रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मात्र या रोशणाईवर संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, संभाजीराजेंनी दृष्टीकोण निगेटीव्ह ठेवला तर सगळंच निगेटीव्ह वाटतं.

यानंतर संभाजीराजे म्हणाले होते की त्यांनी श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी टीका केली नसल्याचे स्पष्ट केले होते. पण पुरातत्व खात्याला त्यांनी खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले होते की, मी भाजपाकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही.

पण किल्ले रायगडावरून कोणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे.

मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचा दाखवा तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो, असे संभाजीराजे म्हणाले होते. मागच्या वर्षी संप्टेबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या नाशिकमधील सभेत बोलताना संभाजीराजे यांनी विरोधकांवर कसून टिका केली होती.

यावेळी उपस्थितांना त्यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. तेव्हा संभाजीराजे म्हणाले होते की, छत्रपती संभाजी म्हणून नाही तर एक मराठा समाजाचा सेवक म्हणून येथे आलोय.

कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचे मी नम्रपणे टाळतो पण शेवटपर्यंत मी लढाई लढणार. राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय.

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तरी छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊदे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊदे.

संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून जाईल, असे संभाजीराजे म्हणाले होते. दरम्यान, संभाजीराजे नेहमीच मराठा समाजाच्या कल्याणासाठी धावून आले आहेत.

सध्या ते मराठा समाजाला आरक्षण मिळवूण देण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
अजबंच! हा फोटो व्हायरल होताच आयफोन धारकांना ऍपल कंपनीने दिला धोक्याचा इशारा
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.