संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भडकले, म्हणाले…

कोल्हापूर | भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सारथी या संस्थेवरून आणि मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावरून टीका केली आहे.

सारथी या संस्थेबाबत उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही. याशिवाय मराठा समाजाची एकही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर लावला आहे.

राजश्री शाहूमहाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या सारथी या संस्थेच्या मागण्यांसाठी आम्ही पुण्यात ११ जानेवारीला आंदोलन केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तिथे आले.

एकनाथ शिंदे यांनी तिथे येऊन ग्वाही दिली की, आम्ही सर्व मागण्या पूर्ण करू. मुख्यमंत्री ठाकरेदेखील माझ्याशी बोलले. त्यांनी देखील मला शब्द दिला पण त्यांनी आपला शब्द पाळला नाही.

या संस्थेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी निधी दिला नाही. दिलेला निधी परत पाठवला. संस्थेतील अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला म्हणून त्याची चौकशी करण्यात आली.

याबाबत निकालही अजून आला नाही. तो चुकला असेल तर त्याला शिक्षाही केली नाही. हे सर्व करण्यामागे फक्त मराठा समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. असा आरोप संभाजी राजे यांनी केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.