मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही; संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राजकारण खुप तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर आता १६ तारखेला कोल्हापुरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पण या आंदोलनावरुन खासदास संभाजी राजे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे.

मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. संभाजीराजे यांनी कोपर्डीत जाऊन निर्भयाच्या कुटुंबाची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.

कोपर्डी प्रकरणानंतर ५८ मोर्चे निघाले होते. याची दखल संपुर्ण देशाने घेतली होती. पीडितेच्या कुटुंबाने न्याय मिळावा अशी विनंती केली होती. गेल्या ४ वर्षांपासून हा खटला न्यायालयात आले.

आपण शाहू-फुले- आंबेडकरांच्या राज्यात राहतो. त्यामुळे मी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच स्पेशल बॅच तयार करुन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तसेच मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे, त्यामुळे मी लोकांना वेठीस धरु शकत नाही. २००७ पासून मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले मला माहिती नाही. मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेल, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्याप्रकारे सकाळी आरती करतो, तसे चंद्रकांत पाटील यांचे झाले आहे. त्यांच्या मनात असे का येते काही कळत नाही. मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे तेच याबद्दल सांगु शकतील, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. हे प्रसारमाध्यमांनी दाखवले, वृत्तपत्रात पण आले. हे जर खोटं असेल, तर त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा. त्याला वकिल लागले तर मी द्यायला तयार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कार्याला सलाम! महाराष्ट्र पोलीस रेहाना बनल्या कोरोना संकटात सापडलेल्या ५० मुलांच्या आई
भारतीय वंशाच्या पत्रकाराने ‘असा’ केला चीनचा पर्दाफाश; पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव
महत्वाची माहिती! कोरोनाच्या आणि पावसाळ्याच्या काळात अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.