शिवशक्ती भीमशक्तीची जोडी जमली; मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना प्रकाश आंबेडकरांची साथ

सध्या मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात मुद्दा पेटलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केला. त्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्याता आला आहे.

पण याचदरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की कोरोनाचे गांभीर्य राखत शांतता राखा. तसेच दोन तीन दिवस झाले या विषयावरून ते राज्यभर दौरा करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

याचदरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली. यावेळी मी संभाजीराजेंसोबत आहे असे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती, ती वेळ आज आली. यापूर्वी आम्ही अनेकवेळा भेटलो होतो. मला शाहू महाराजांचा आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे.

शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आहोत. आता राज्यातील अनेक नेत्यांसमवेत दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे असं संभाजीराजे म्हणाले. तर प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण मी ४० वर्षांपासून जवळून पाहत आलो आहे.

ते नरोबा आणि कुंजोबाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत निर्णय घेतील. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरं म्हणजे याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणे.

पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. त्यामध्ये ताजेपणा येण्याची आवश्यकता आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यामध्ये ताजेपणा येईल. मी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. पण संभाजीराजेंसोबत जायला तयार आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या
भारतापेक्षा जास्त परमाणू बॉम्ब असतानाही पाकीस्तान का घाबरतं भारताला? खरं कारण आलं समोर
नव्या नवरीने अर्ध्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावले घरी अन् पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं…
लोकं तर लोकं आता सलमानच्या वडिलांनीही दिला ‘राधे’ला निगेटिव्ह रिव्ह्यु; म्हणाले…
PSI सह पाच पोलिस निलंबित; निरपराध व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.