संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात एक संतप्त लाट तयार झाली आहे. मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेत असल्याचे दिसून आले आहे.

शुक्रवार दिनांक २८ मे रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघा नेत्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा झाल्याची माहिती समजली आहे. युवराज छत्रपती संभाजीराजे हे सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.

शुक्रवारी ते दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाला आता कोणते वळण मिळते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं.

त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं. मी हात जोडून सांगितलं, विनम्रपणे सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आता आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील”.

राज ठाकरे आणि शरद पवार यांची पण छत्रपती संभाजीराजे याणी भेट घेतली होती. छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका पण झाली होती. संभाजीराजे मराठा आरक्षणावरून सर्व पक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

ताज्या बातम्या
..त्यामुळे करण जोहरने मला तीन वेळा लग्नासाठी नकार दिला होता, नेहा धुपियाचा खुलासा

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याचे भाजपशी थेट संबंध; सर्वच पुरावे झाले उघड

मोठी बातमी! हिटमॅन रोहीत शर्माकडे सोपवणार टिम इंडीयाच्या कर्णधार पदाची जबाबदारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.