मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकारने सर्वोतपरी प्रयत्न केले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही – संभाजीराजे

संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिम कोर्टाने आज निकाल जाहीर झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

आता या निकालानंतर खासदार संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचा मी आदर करतो. परंतू आजचा दिवस हा मराठा समाजासाठी दुर्देवी आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

सध्या मराठा समाजाला संयम बाळगण्याची गरज आहे. सध्याची कोरोना स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षणा घेण्यासाठी आधी आपण जीवंतर राहिले पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत मराठा समाजाने कोणीतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

सध्या मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी सुपरन्यमुररी हाच एकमेव पर्याय दिसत आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने आता सुपरन्यमुररी सुत्राचा वापर करुन शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिम कोर्ट म्हणाले मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस आहे- ऍड. गुणरत्न सदावर्ते
‘आई कुठ काय करते’ मालिकेतील यश खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.