राज्यात शहरांची नावे बदलण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, पुण्याचे नाव जिजापुर करण्याच्या मागणीचा वाद शिगेला पोहोचला असताना साताऱ्यात संतप्त घटना घडली आहे.
खासदार उद्यनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन केले होते. या ग्रेडसेपरेटरला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या या फलकाची काही व्यक्तींनी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ७५ कोटी रूपये खर्च करून ग्रेडसेपरेटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले होते. या भुयारी मार्गांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची नावे देण्यात आली होती. यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक काही समाजकंटकांनी फाडला आहे. या घटनेनंतर खासदार उद्यनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवईनाक्यावर गर्दी केली होती.
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक आणि उदयनराजे समर्थक यांनी घटनेमागे ज्या व्यक्तींचा हात आहे त्यांचा पोलिसांनी शोध घेवून कठोर कारवाई करावी नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा पवित्रा घेतला. या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
भंडारा : …तर दुर्घटना घडली नसती; RTIच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
…नाहीतर ८ फेब्रुवारीपासून तुमचे व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार; व्हॉट्सअपची नवी पॉलिसी
काय सांगता! कोरोना झाल्यानंतर अभिषेक बच्चनला अजय देवगणने फोन करुन झापलं होतं
भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका; ‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’