Share

Prakash Ambedkar : फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ तुरूंगात टाका – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर छत्रपती संभाजी राजे आणि भिडे गुरुजी यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मी या वादावर फार बोलू इच्छित नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करत संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकले पाहिजे.” ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, “तुम्ही सध्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना आठवा. जो कोणी राजदंड हातात घेतो, त्याला राज्य चालवता आलं पाहिजे. जो कायद्याचे पालन करत नाही, त्याला तुरुंगात टाकण्याची संधी मिळायलाच हवी.” आंबेडकर यांनी पुढे असंही म्हटले की, “भीमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना पाठिंबा दिला होता, ती चूक पुन्हा करू नका.”

त्याचवेळी, भाजपच्या सौगात-ए-मोदी कार्यक्रमावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली. भाजपने रमजान ईदच्या मुहूर्तावर 32 लाख मुस्लिम कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी किट’ देण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खाद्यपदार्थ आणि कपडे असतील. यावर आंबेडकर म्हणाले, “इतर पक्ष वाटप करत असतात, पण भाजपच्या आरएसएसने या कार्यक्रमामध्ये राजकारण घातले आहे. 1999 पासून सत्तेत आल्यानंतर भाजपने मुस्लिम विरोधी भूमिका घेतली आहे. गोध्रा घडवून त्यावरून दंगली उसळवल्या. २०१४ नंतर अनेक मुस्लिमांच्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये भाजपने काहीच कारवाई केली नाही.”

आंबेडकर म्हणाले की, “यातून स्पष्ट होते की भाजप मुस्लिमांना साईड ट्रॅक करायला इच्छित आहे. सौगात-ए-मोदी हा एक राजकीय कार्यक्रम आहे, त्याचा उद्देश्य मुस्लिम मतांची हेराफेरी करणे आहे.” त्यांनी पुढे असंही सांगितलं की, “22 टक्के हिंदू देश सोडून जाण्याची तयारी करत आहेत, आणि याच्याच पाश्र्वभूमीवर भाजप हे कृत्य करीत आहे. ते मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे काम करत आहेत.”

मौलवींना या किटचा स्वीकार करावा की नाही, यावर विचार करायला हवं, असं ते म्हणाले. तसेच, कट्टरपंथी हिंदूंना प्रश्न विचारत आंबेडकर यांनी म्हटलं की, “तुम्हाला फसवलं जात आहे का?”

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now